Death will happen.. then

मृत्यू तर होणारच..मग

काळ सकाळी एक दु:खद बातमी मनोज लाड या माझ्या मित्राने सांगितली..आमच्या पेक्षा काही वर्षांनी मोठया असणाऱ्या आमच्या मित्राचा अपघाता मध्ये मृत्यू झाला .काही काळ पूर्वी त्याचे वडीलांचे निधन झालते आणि आता तो पण आपल्याला सोडून निघून गेला..त्याच्या घरी फक्त आई आणि त्याची ताई आहे..एवढाच परिवार आहे .घरातील कमवता हातच जर सोडून जात असेल तर त्या घरावर काय संकंट येतील त्याची कल्पना न केळेली बरी..

मग काय सर्वांनी आप आपल्या सोशल मिडियावर फोटो ठेवायला चालू केले ,जवळपास सर्वांनी स्टेटस ठेवले होते..चांगली गोष्ट आहे की तूम्ही दु:ख झाले आहे हे जगाला सांगत आहात..पण जेव्हा तो जीवंत होता ,जेव्हा तो जीवन जगत होता त्याला काय अडचणी होत्या का,त्या पैशाची गरज होती का,त्याच्यावर काही संकंट होते का,तो कसा आहे हे कधी विचारायला आपल्याकडे वेळ होता का,कधी विचारला का या सर्व गोष्टी त्या मित्राला…आता तो गेल्यावर फक्त स्टेटस ठेवून फक्त् तूमचे दु:ख तूम्ही जगा समोर मांडत आहात..त्याच्या जीवनात तूमचा काय फायदा झाला का,कधी मित्र म्हणून तूम्ही चौकशी केली का की तो कसा आहे म्हणून..

जीवन जगत असताना तूम्ही ज्या मित्राबरोबर काही वर्ष घालवले आणि जेव्हा तूम्ही मोठे होता साधी विचारपूस पण करत नसाल तूमच्या जीवनात एवढे तूम्ही मग्न झाला असाल की आपल्या मित्राच्या आयुष्यात काय चालू आहे हे सुध्दा तूम्हाला माहीत नसेल तर काय उपयोग तूमचा या मित्राचा जीवनात ,कोणत्या अधिकाराने हे दु:ख झाले आहे म्हणून जगाला दाखवत आहात..

तूम्ही ज्या व्यक्तीच्या संपर्कात आहात कमीत कमीत त्या व्यक्तीला तर विचार अरे तू कसा आहेस,तूला कशाची गरज आहे का, काही आर्थिक मदत हवी आहे का,का फक्त पैसा कमवणार ,मोठे होणार ,कार घेणार ,घर बांधणार ,लग्न करणार ,सगळया गोष्टी स्वत:साठी करणार ,पण आपल्या मित्राला साधे विचारणार पण नाही की तू कसा आहेस..

चार कमवणार तूम्ही पण शेवटी बोलण्या साठी ,चार गोष्टी तूमच्या ऐकून घेण्यासाठी ,तूमच्या वर जर संकंट आली जर चांगला मित्र असेल तर तोच धावून येणार आहे तूमच्या आयुष्यात.

आज जरी तूम्हाला त्या मित्राशी गरज वाटत नसली पण भविष्यात त्या मित्राची गरज पडली तर तो मित्र तूम्हाला नक्की मदत करेन पण तूम्ही तूमच्या चांगल्या काळा मध्ये त्याला साधे तू कसा आहेस ,हे पण विचारायला तूमच्या कडे वेळ नाही असे दाखवत असाल तर आणि शेवटी तो मित्र गेल्यावर फक्त स्टेटस ला मला दु:ख झाले हे जगाला ओरडून सांगत असाल तर तूम्ही फक्त वर वरची मैत्री करतात आणि तूम्ही तूमच्या जीवनात ऐवढे रमला आहे की तूम्हाल आजूबाजूच्या माणसांचा विसर पडला आहे ..आणि तूम्ही वर वर स्वार्थी होत चाललेले आहात..

किती पैसा कमवा पण शेवटी हे जग सोडुन जायचे आहे हे सत्य सर्वांनाच माहित आहे..मग या कमी काळावधी मध्ये आपल्या माणसांत न राहता तूम्ही त्या पैशाच्या मागे धावून तूम्हाला शेवटी काय सिध्द करायचे आहे..

चार पैसे कमवून आपल्या माणसांच्या सानिध्यात राहणे सर्वांचे ध्येय असले पाहिजे..

आपल्या माणसांना काय हवे ,काय नाही ,एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे..

जीवनात फक्त एखादया माणसाला फक्त मी आहे तूझ्या सोबत एवढा जरी संवाद केला तर त्याला जगण्याची ताकद भेटेल आणि तो अजून जोमोन तो जीवन जगेल.

मी खूप व्यस्त आहे हे दाखवून देवू नका ,उलटे लोकांच्या कामाला या,लोकांना मदत करा,समजा मदत नसेल होत तर त्या व्यकती ला कॉल करून आधार दया,सतत त्या व्यक्तीशी बोलत रहा..

जास्त वेळ नाही कमीत कमीत काही मिनिंट तरी त्याच्याशी संवाद साधा..

पैसा कमवणे हे ध्येय ठेवून जगू नका,किती माणसांचया सानिध्यात तूम्ही राहता,तूम्हाला माणसांत रमता आले पाहिजे,एखादया इलेक्ट्रॉनिक वस्तू रमण्यापेक्षा माणसांच्या जीवनात रमायला शिकले पाहिजे…

एकमेकांना साथ देउन एकमेकांचे आयुष्याला मदत होणार आहे,जरी आज तूम्हाला कशाचीही मदत लागत नसेल पण भविष्य तूमच्या हातात नाही..कधी कोणत्या व्यक्तींची मदत तूम्हाल लागेल ते सांगता येत नाही..म्हणून प्रत्येकांचा आदर करा जे तूमच्या आयुष्यात आहेत आणि होते त्यांची विचारपूस करा..

मृत्यू तर सर्वांना येणारच आहे मग सगळयांच्या मनात शेवटी तो चांगला माणूस होता प्रत्येकाच्या मदतीला येत होता हे उदगार निघणे तूमच्या पाठीमागे राहून गेलेल्या परिवारातील सदस्यास ते सुखावणारे वाक्य ठरेल…

लेखक : राम ढेकणे

Leave a Comment

Your email address will not be published.